गूगल फॉर्म (Google form) हा सर्वच क्षेत्रांमध्ये उपयुक्त मानला जातो. शैक्षणिक क्षेत्रात तर याचे अनन्यसाधारण महत्व आहे. गूगल फॉर्म शिक्षकांसाठी एक उत्तम साधन आहे आणि ते सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.
हा कोर्स कुणासाठी?
१) प्राथमिक शिक्षक (primary teacher), २) माध्यमिक शिक्षक(secondary teacher), ३) कनिष्ठ (junior college) व वरिष्ठ महाविद्यालयातील (senior college) ४) इतर सर्व शाखांमधील शिक्षकासाठी महत्वपूर्ण असेल.
सदर कोर्स मध्ये, गुगल फॉर्म चा शैक्षणिक क्षेत्रात किती विविधतेने आपण उपयोग करू शकतो याचे महत्व स्पष्ट केले आहे.
या कोर्स मध्ये आपण काय शिकणार?
१) विद्यार्थ्यांची माहिती व इतर आवश्यक माहिती संकलन करणे.
२) विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढावे याकरिता असणाऱ्या विविध चाचणी परीक्षा जसे क्विझ(quiz), लहान उत्तर (short answer) आणि दीर्घ उत्तर(long answer),एकाधिक-निवड(multiple choice questions) व त्याचे मूल्यमापन व माहिती संकलन.
३) परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना.
४) गुणपत्रक तयार करून निकाल जाहीर करणे व विद्यार्थ्यांना इ-प्रमाणपत्र पाठविणे.
५) याव्यतिरिक्त आपले असणारे प्रश्न व त्यामधून येणारे इतर सर्व विषय.
कोर्स मधील विषय:
हा कोर्स तीन विभागात खालीलप्रमाणे विभागलेला आहे.
विभाग -१: गूगल फॉर्म (google form)च्या महत्त्वपूर्ण सेटिंग्ज(settings):
१) Google form चा परिचय?
२) Add on काय आहे?
३) थीम(theme), रंग(colour) आणि फॉन्ट सेटिंग्ज (font settings) कशा बदलणार?
४) गणितीय समीकरणे (Mathematical equation) कशी लिहिणार?
५) प्रश्न (questions) आयात कसे करावे?
६) प्रतिमा (Image)कशी अपलोड करावी?
७) व्हिडिओ (Video)आयात कसा करावा?
८) इमोजी(emoji), संकेतचिन्ह (symbols)आणि आकार(Shapes) कसे जोडणार?
९) प्रतिसाद(responses) कसे हटवणार?
१०) लिंक(Link) कशी तयार करावी व सामायिक(share )कशी करावी?
विभाग -२: क्विझ(quiz), छोटी उत्तरे(short answer) आणि दीर्घ उत्तर (long answer) प्रश्न.
11) क्विझ(quiz) कसे तयार करावे आणि स्वयं-उत्तर(auto-answer) कसे सेट करावे,
12) विभाग(section) व संकेतशब्द(password) कसा सेट करावा?
१३) वेळ मर्यादा(time limit) व सहभागींची मर्यादा(participants limit) कशी सेट करणार?
१४) जोड्या जुळवा(Matching questions) सारखे प्रश्न कसे तयार करणार?
१५) प्रतिमा(image)चा करून एकाधिक-निवड(multiple choice questions) कसे तयार करावे?
१६) लहान उत्तर (short answer) आणि दीर्घ उत्तर(long answer) प्रश्नांची निर्मिती आणि त्याचे
मूल्यांकन(assessment) कसे तयार करावे,
विभाग -3 : शिक्षक विशेष(Teacher special)
१७) वेगवेगळ्या तुकडी (division)साठी एक प्रश्नपत्र (question paper) तयार कसे करावे?
१८) विद्यार्थ्यांची उपस्थिती (attendance) कशी तयार करावीत?
१९) प्रमाणपत्र (certificate) कसे तयार करावे व ते ई-मेलवर स्वयंचलितपणे(automatically) कसे पाठवावे?
२०) ई-मेलवर स्वयंचलितपणे(automatically) ई-प्रमाणपत्र कसे पाठवायचे आणि स्वहस्ते (Manually) प्रमाणपत्र
कसे तयार करावे हे जाणून घेऊ शकता.